संमोहन आणि अध्यात्मिक विज्ञान

संमोहन, समुपदेशन, NLP, लोलकविद्या, वास्तुशास्त्र, रेकी आणि खूप काही.

संमोहन तज्ज्ञ
श्री. मुकुंद देंडगे
एम्.ए. (मानसशास्त्र) बी.एड्.
संमोहन क्षेत्रातील २५ वर्षांचा परिपूर्ण अनुभव
शिक्षण क्षेत्रातील २७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव
आम्ही काय करतो ?
आमच्या सेवा
लोलकविद्या
भविष्य कथनाची एक अनोखी पद्धत
वास्तुशास्त्र
सुखी, समृद्ध, आनंदी जीवनासाठी वास्तुदोषांवर प्रभावी उपाय

आपले फ्री Android APP वापरुन पहा
Hypno in Marathi
जगातील संमोहनावरील एकमेव व पहिले मराठी फ्री अॅप
- गाढ झोप (फ्री अॅप)
- विद्यार्थ्यांसाठी ( वय ९ ते १२ वर्ष )
- विद्यार्थ्यांसाठी ( वय १२ वर्षांच्या पुढील )
- महिलांसाठी (मासिकपाळी विषयक समस्यांसाठी )
- सर्वांसाठी व्यक्तिमत्व विकास
- निद्रानाशावर उपचार
- वजन कमी करण्यासाठी
- वजन वाढविण्यासाठी
- दारूचे व्यसन सोडविण्यासाठी
लोकांचे मत
प्रशंसापत्र

वेताळ अक्षय पंडित
अंतराळ अनुप्रयोग केंद्रातील वैज्ञानिक / अभियंता - इस्रो अहमदाबाद
मी दहावीमध्ये असताना श्री. मुकुंद देंडगे सरांचे 'स्व-संमोहन' हे ३ दिवसांचे शिबीर केले. आपण आपली इच्छाशक्ती जागृत करून तिच्या सामर्थ्यावर आपली ध्येय आणि महत्वाकांक्षा कशा प्राप्त करू शकतो याचे योग्य मार्गदर्शन सरांकडून मिळाले. शिबिरातील सूचना मी स्वतः अमलात आणल्या आणि दहावीत असतानाच ठरवले आपण काही वेगळे करायचे. Space Science कडे माझा कल असल्याने त्या क्षेत्रात करियर करायचे ध्येय ठेवले. स्व-संमोहनातून दृढ झालेल्या एकाग्रतेच्या जोरावर चांगला अभ्यास करून IIT-JEE Mains आणि Advanced मध्ये चांगले गुण मिळविले. ह्या गुणांच्या जोरावर Indian Institute of Space Science and Technology (IIST) -Trivandrum येथे प्रवेश मिळाला. येथे ४ वर्षे ISRO मध्ये Scientist पदावर जाण्याचे ध्येय मनात ठेवून अभ्यास केला आणि B-Tech Avionics ही पदवी मिळवली.आज मी Space Application Center, ISRO (SAC-Ahmedabad) येथे Scientist/Engineer पदावर आहे.
ह्या सर्व प्रवासामध्ये श्री. मुकुंद देंडगे ह्यांचे एखाद्या गुरुप्रमाणे जे मार्गदर्शन लाभले ते खूप मोलाचे ठरले. एखादे ध्येय मनात ठेवून त्या दृष्टीने वाटचाल करून ते मिळवण्याची ताकद स्व-संमोहनातून मिळाली. स्व-संमोहनाच्या सूचना वापरून आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी सर्वांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा.
धन्यवाद.

आप्पासाहेब भीमराज ढुस
शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार . आंतरराष्ट्रीय स्तरावर 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्यपदके
सन 2000 साली श्री. मुकुंद देंडगे यांच्या देवळाली प्रवरा ता.राहुरी जि. अहमदनगर येथे झालेल्या स्व-संमोहन कार्यशाळेत सहभागी झालो होतो. कोणत्याही खेळात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असतो तो आत्मविश्वास, जिद्द, धाडस, चिकाटी, जबरदस्त इच्छाशक्ती, कल्पनाशक्ती, सकारात्मक दृष्टिकोन आणि मनाची एकाग्रता. हे सर्व मोठ्या प्रमाणात वाढविण्यात मी श्री. देंडगे सर यांच्या कार्यशाळेमुळे यशस्वी झालो. या सर्वांचा मला मी नुकत्याच शिकत असलेल्या पॅराग्लायडिंग व नंतरच्या काळात पॅरामोटर या हवेतील साहसी खेळातील यशस्वीतेसाठी खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला. त्याचबरोबर आकर्षणाचा सिद्धांतानुसार (Law of Attraction) कल्पनाचित्र अनुभवून मी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा सारख्या ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असूनही स्वतःचे पॅराग्लायडर, पॅरामोटर प्राप्त करून या साहसी क्रीडा प्रकारात देशासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिले सुवर्णपदक, 8 नॅशनल रेकॉर्ड, 5 लाईफटाईम अचिव्हमेंट, महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च साहसी खेळाडू म्हणून शिव छत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्काराचा मानकरी होऊ शकलो. हे सर्व मला श्री. मुकुंद देंडगे सर यांच्या स्व-संमोहन कार्यशाळेतून मिळाले. धन्यवाद सर! आभार..!