1.व्यक्तिगत समुपदेशन
आपले विचार, भावना , अनुभव, मिळणारी वागणूक यामुळे बिघडलेल्या मानसिक स्वास्थ्यावर समुपदेशन. उदाहरणार्थ एकटेपणा, उदासीनता, न्यूनगंड, अहंकार, बेचैनी, निराशा, अस्थिरता , इ.
2.आंतर्व्यक्तिक समुपदेशन
कुटुंब, शेजारी, नोकरी, व्यावसायाच्या ठिकाणी, मित्रांमध्ये असणारे मतभेद व येणाऱ्या समायोजनातील अडचणी यावर समुपदेशन.
3.कौटुंबिक समुपदेशन
कुटुंबातील विविध नात्यांतील आंतरक्रिया, मतभेद व समायोजनातील अडचणींबाबत समुपदेशन.
उदाहरणार्थ पती-पत्नी, वडील-मुलगा, काका-पुतण्या, भाऊ-भाऊ इ. मधील आंतरक्रियांमधील समस्या
4.शैक्षणिक समुपदेशन
बालवाडी ते महाविद्यालयीन शिक्षणातील काळात येणाऱ्या सर्वच समस्यांबाबत समुपदेशन
सर्व वयोगटातील विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे
उदाहरणार्थ- शाळा, माध्यम निवड, वर्तनातील बदल व त्यातून उद्भवणाऱ्या समस्या, शाळेत वर्ग मित्रांशी, शिक्षकांशी समायोजन करताना, घरात आई-वडील , बहीण-भाऊ यांच्याशी समायोजन करताना, पौगंडावस्थेतील बदलांमुळे येणाऱ्या मानसिक, शारीरिक व वर्तनविषयक समस्या, विषयांची निवड, आवडी, छंद यासाठी उपयुक्त
5.व्यावसायिक समुपदेशन
व्यवसाय निवडताना व प्रत्यक्ष व्यवसायात उद्भवणाऱ्या समस्या, कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी यांच्यातील समस्यांवर समुपदेशन